राहुरी विद्यापीठात उद्यापासून अग्निवीरांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुरी विद्यापीठात उद्यापासून अग्निवीरांची भरती
राहुरी विद्यापीठात उद्यापासून अग्निवीरांची भरती

राहुरी विद्यापीठात उद्यापासून अग्निवीरांची भरती

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : नगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात लष्करातील अग्निवीरांची भरती पार पडणार आहे. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान ६८ हजार उमेदवारांची भरती प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती लष्कराने दिली. पुणे, नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या या भरतीसाठी स्थानिक प्रशासन आणि लष्कराने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. तांत्रिक, जनरल ड्यूटी, कारकुनी, स्टोअर कीपर, ट्रेडमन आदी पदांसाठी ही भरती करण्यात आली. दिवसाला पाच हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्याच्यासाठी आवश्यक अन्न, पाणी आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आल्याचे लष्कराने कळविले आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठात डॉक्टरांची एक टीम यासाठी तैनात असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92637 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..