पुरावा न दाखवल्यास मतदानाचा हक्क जाणार प्रारूप यादीपैकी ११ हजार जणांचे पुनर्वसन नाही; संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरावा न दाखवल्यास मतदानाचा हक्क जाणार
प्रारूप यादीपैकी ११ हजार जणांचे पुनर्वसन नाही; संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
पुरावा न दाखवल्यास मतदानाचा हक्क जाणार प्रारूप यादीपैकी ११ हजार जणांचे पुनर्वसन नाही; संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

पुरावा न दाखवल्यास मतदानाचा हक्क जाणार प्रारूप यादीपैकी ११ हजार जणांचे पुनर्वसन नाही; संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने २२ हजार ८८९ मतदारांची प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे. मात्र, यातील ११ हजार जणांचे पुनर्वसन झालेले नाही, त्यामुळे आता या व्यावसायिकांना ते कुठे व्यवसाय करतात याचा पुरावा देण्याची वेळ आली आहे. अन्यथा त्यांचे मतदारयादीतील नाव वगळले जाणार आहे. महापालिकेच्या या कार्यपद्धतीवर पथारी संघटनांनी टीका केली आहे. तसेच याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार महापालिकेने फेरीवाला निवडणूक जाहीर केली असून, यातील फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी २२ हजार ८८९ मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली आहे. त्यावर ५ सप्टेंबरपर्यंत हरकत व सूचना नोंदविण्याची मुदत आहे.

क्षेत्रीय कार्यालयात व्यवस्थाच नाही
एकीकडे हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत सुरू झालेली असताना महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात मतदारयादी उपलब्ध नाही तसेच हरकती नोंदवून घेण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही. यामुळे अनेक फेरीवाले हे जाणीव संघटनेच्या कार्यालयात येऊन याद्यांमध्ये आपले नाव आहे की नाही ते पाहत होते. शहरात ४० हजार फेरीवाले असताना त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे, अशी टीका जाणीवचे कार्यवाह संजय शंके यांनी केली.

महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह महापालिकेच्या संकेतस्थळावरही फेरीवाला मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. हरकती नोंदविण्यासाठीची यंत्रणा दुपारपासून कार्यान्वित झाली आहे. २२ हजार ८८९ मतदारांपैकी ११ हजार मतदारांचे पुनर्वसन झालेले नाही, त्यामुळे ते व्यवसाय करत आहेत की नाही याची माहिती उपलब्ध नसल्याने त्यांनी त्याचा पुरावा देणे आवश्‍यक आहे, अन्यथा नाव वगळले जाईल.
- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

प्रारूप मतदारयादी चुकीची आहे. सिंहगड रस्ता, पुणे स्टेशन, वडगाव शेरी, बाणेर, महात्मा फुले मंडईतील विक्रेते, चर्मकार हे नोंदणीकृत पथारी व्यावसायिक असताना त्यांची नावे मतदारयादीत नाहीत. सध्या गडबडीत मतदारयादी तयार केली आहे. त्यामुळे ही यादी सुधारित करावी अन्यथा याविरोधात न्यायालयात जाऊ.
- बाळासाहेब मोरे, सरचिटणीस, पथारी व्यावसायिक पंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92645 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..