लहान भावाचा वसा पुढे नेतोय मोठा भाऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहान भावाचा वसा 
पुढे नेतोय मोठा भाऊ
लहान भावाचा वसा पुढे नेतोय मोठा भाऊ

लहान भावाचा वसा पुढे नेतोय मोठा भाऊ

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः लोकांना मदत करणे, परिसरातील मुलांच्या समस्या सोडवणे, ज्‍येष्ठ नागरिकांना घरपोच पुस्तके तसेच शाळा, महाविद्यालयातील मित्रांना जमेल तशी आर्थिक मदत करणे, विविध शिबिरांचे आयोजन करणे या प्रकारची सामाजिक कामे तुषार करत असे. त्याला लहानपणापासून समाज कार्याची आवड होती. मात्र अचानक आजाराने त्याच्यावर घाला केला. काळाने त्याला हिरावून नेले. त्याच्या कार्यात कोठेही खंड पडू नये म्हणून तुषारचा मोठा भाऊ नकुल तळवलकर समाज कार्याचा वसा पुढे सुरु ठेवला आहे.
सिंहगड रस्त्यावरील दामोदर नगर भागातील तुषार अनिल तळवलकर वयाच्या २९ व्या वर्षी आजारामुळे आमच्या परिवारातून निघून गेला. अवघ्या तारुण्यात त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून कसे बाहेर पडावे हे समजत नव्हते. मात्र, या परिस्थितीतून बाहेर पडणे आवश्यक होते. त्यामुळे त्याच्या आवडीच्या समाजकार्याच्या वसा पुढे घेऊन जायचे आम्ही ठरवले. तो २०१४ साली गेला. त्यानंतर एक वर्षांनी २०१५ मध्ये तुषार तळवलकर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. दहावीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना सृजन शिष्यवृत्ती देऊ करून आर्थिक मदत देण्यास सुरवात केली. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून तुषारच्या स्मृती आम्ही जतन करत आहोत, असे सांगताना नकुल भावुक झाले.

यंदा दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्ताने दहावीच्या यशस्वी विद्यार्थिंनीना शिष्यवृत्तीचे वाटप केले. तुषारच्या काम पुढे घेऊन जात असताना त्याच्या आठवणींना उजाळा मिळतो. त्यामुळे कोणताही स्वार्थ न ठेवता हे कार्य सुरु आहे. लहान भावावर सर्वच मोठ्या भावाचे प्रेम असते. तसे माझे ही आहे.
- नकुल तळवलकर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92672 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..