विद्यार्थीनीवर सात वर्षांपुर्वी अश्‍लिल कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थीनीवर सात वर्षांपुर्वी अश्‍लिल कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस
विद्यार्थीनीवर सात वर्षांपुर्वी अश्‍लिल कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस

विद्यार्थीनीवर सात वर्षांपुर्वी अश्‍लिल कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः शाळांमध्ये चांगल्या वाईट स्पर्शाबाबत (गुड टच बॅड टच) माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या समुपदेशन कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने ती तिसरीमध्ये शिकत असताना तोंडओळख असलेल्या तरुणाने तिच्यासमवेत अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. या प्रकाराची समुपदेशकांनी गांभीर्याने दखल घेत पोलिस ठाणे गाठले. दरम्यान, उत्तमनगर पोलिसांनीही याप्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच बॅड टच’ बाबत माहिती देण्यासाठी समुपदेशन वर्गाचे आयोजन केले होते. त्यावेळी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने समुपदेशक महिला कार्यकर्त्यांना तिच्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पीडित मुलगी तिसरीमध्ये शिक्षण घेत असतानाच तिच्या तोंडओळखीतील एका तरुणाने तिला घरी बोलावले. त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचे तिने सांगितले. ‘मुस्कान’ संस्थेतील कार्यकर्त्यांनी तिला धीर दिला. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा संशयित आरोपी हा त्यावेळी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92683 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..