गणेशोत्सव मंडळांना एक तासात परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव मंडळांना 
एक तासात परवानगी
गणेशोत्सव मंडळांना एक तासात परवानगी

गणेशोत्सव मंडळांना एक तासात परवानगी

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांकडून पोलिस ठाण्याअंतर्गत ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्यात आली आहे. मंडळांचे अर्ज आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे, वाहतूक शाखा व विशेष शाखेच्या पोलिसांकडून मंडळाच्या जागेची पाहणी करून, कागदपत्रांची तपासणी करून एक तासातच परवानी दिली जात आहे. आत्तापर्यंत पोलिसांकडे अकराशे अर्ज आले असून त्यापैकी एक हजार मंडळांना तत्काळ परवानगी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका, अशा सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार, पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना सहकार्याची भूमिका घेण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रमुख गणेशोत्सव मंडळे, मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, शांतता समिती सदस्य व पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या सदस्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह परिमंडळननिहाय पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा व विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. कर्णिक यांनी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्यासमवेत परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली.

एक हजार मंडळांना परवानगी
गणेशोत्सव मंडळांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक पोलिस ठाण्याचे दोन पोलिस, वाहतूक शाखेचे एक व विशेष शाखेचे एक पोलिस अधिकारी व कर्मचारी गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या परवानगी अर्जाची दखल घेतात. प्रत्यक्षात मंडळांची पाहणी, त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पाहणी करून त्यांना परवानगी दिली जात आहे. विशेष शाखेकडे आत्तापर्यंत अकराशे अर्ज आले आहेत. त्यापैकी एक हजार अर्जांना परवानगी दिली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या अर्जांची पाहणी करुन परवानगी देत आहेत. परवानगी देण्याबरोबरच वाहतूक व गर्दीची ठिकाणे निवडून त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.
- डॉ. प्रियांका नारनवरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92693 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..