विद्यापीठात प्रिंटिंग मशिनचे उद्‌घाटन एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्र होणार प्रिंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात प्रिंटिंग मशिनचे उद्‌घाटन
एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्र होणार प्रिंट
विद्यापीठात प्रिंटिंग मशिनचे उद्‌घाटन एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्र होणार प्रिंट

विद्यापीठात प्रिंटिंग मशिनचे उद्‌घाटन एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्र होणार प्रिंट

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र छापण्याच्या मशिनचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. या मशिनमुळे आता एका दिवसात चाळीस हजार पानांची छपाई करणे शक्य होणार आहे.
परीक्षा विभागातील प्रिंटिंग युनिटमध्ये या मशिनचे उद्‌घाटन झाले. या वेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस, डॉ. संजय चाकणे, डॉ. महेश आबाळे, परीक्षा विभागातील विशेष कार्याधिकारी दत्तात्रेय कुटे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सोनवणे म्हणाले, ‘‘विद्यापीठ हे पुणे, नगर आणि नाशिक येथील जवळपास ६५० महाविद्यालयांशी संलग्न असून साधारण आठ लाख विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून गुणपत्रिका त्याबरोबरच पदवी प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हे मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.’’ डॉ. काकडे म्हणाले, ‘‘आधीच्या मशिनमध्ये एकावेळी केवळ पाचशे पेपर लोड केले जात होते. यामध्ये मात्र एकावेळी आठ हजार पेपर लोड करता येतात. तसेच यामध्ये प्रिंटिंगची गुणवत्तादेखील वाढणार आहे. ‘इमेज प्रोसेसिंग’ जलद होणार असल्याने वेळ वाचणार आहे.’’

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची छपाई अधिक जलद होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रिंटिंग मशिनची खरेदी केली आहे. परीक्षा विभाग अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे.
- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92775 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..