‘सिलाई वर्ल्ड’तर्फे कुर्ता, काठ-पदर साडी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिलाई वर्ल्ड’तर्फे कुर्ता,
काठ-पदर साडी महोत्सव
‘सिलाई वर्ल्ड’तर्फे कुर्ता, काठ-पदर साडी महोत्सव

‘सिलाई वर्ल्ड’तर्फे कुर्ता, काठ-पदर साडी महोत्सव

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः लाडक्या बाप्पांचे स्वागत पारंपारिक पोशाख परिधान करून करावे असे शास्त्रातही सांगिले असून ते लक्षात घेऊन ‘सिलाई वर्ल्ड’ने आयोजित केला आहे, पारंपारिक पोशाखाचा खास महोत्सव! यामध्ये पुरुषांसाठी खास ‘कुर्ता महोत्सव’ असेल. त्यात जीन्स वरही शोभून दिसणाऱ्या ट्रेंडी कुर्त्याची मोठी व्हरायटीज उपलब्ध आहे. तसेच पुरुषांसाठी फेस्टिव्ह कॅज्युअल्सही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व त्यामध्येही दोनच्या खरेदीवर सात मोफत किंवा एकच्या खरेदीवर तीन मोफत अशी आकर्षक ऑफर आहे.
महिलांसाठीही ‘गौरी गणपती काठ-पदर साडी महोत्सव’ आयोजित करण्यात आलेला आहे. गौरी-गणपतीच्या पुजेमध्ये या काठ-पदराच्या साड्यांना असणारे महत्त्व व त्यांची सुंदरता लक्षात घेऊन या खास साड्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणजे ‘सहा साड्या घेऊन जा व एक साडीचे पैसे द्या’ ही ऑफर! यामुळे महिलांना आवडत्या रंगातील तब्बल सहा साड्या खरेदी करण्याची आकर्षक संधी आहे. या साड्यांमध्ये शालू, घागरा, बनारसी सिल्क, पैठणी, गढवाल सिल्क, नल्ली सिल्क, खण साड्या व डिझायनर साड्या असे असंख्य मनमोहक प्रकार उपलब्ध आहेत.
‘‘लॉकडाउनच्या दोन वर्षांच्या अंतरानंतर यंदाचा गणेशोत्सव होणार आहे. प्रत्येकजण मोठ्या उत्साहात बाप्पांचे स्वागत करणार आहे. हे लक्षात घेऊनच हा उत्सव अधिक पारंपारिक पद्धतीने साजरा व्हावा या उद्देशातून आम्ही या महोत्सवाचे आयोजन केले आहे,’’ असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. सिलाई वर्ल्डच्या कात्रज आंबेगाव, बाजीराव रोड, टिळक रोड, पौड रोड, चिंचवड व भिगवण रोड, बारामती शोरूम्समध्ये हा महोत्सव असेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92791 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..