‘सेडा’तर्फे गुरुवारी शैक्षणिक परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सेडा’तर्फे गुरुवारी शैक्षणिक परिषद
‘सेडा’तर्फे गुरुवारी शैक्षणिक परिषद

‘सेडा’तर्फे गुरुवारी शैक्षणिक परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट अडमिनीस्ट्रेशन (सेडा) या संस्थेच्यावतीने नॅकद्वारे महाविद्यालय मुल्यांकन संकल्पना या विषयावर शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद गुरुवारी (ता. २५) कर्वे रस्त्यावरील बाल शिक्षण शाळेच्या परिसरात होणार आहे.

‘सेडा’कडून नॅकद्वारा महाविद्यालय, विद्यापीठे मुल्यांकन प्रक्रियेत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. या पार्श्‍वभूमीवर ‘सेडा’चे अध्यक्ष व नॅक कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या सामूहिक चर्चेतून नॅकद्वारा महाविद्यालय मुल्यांकन संकल्पना, पद्धतीविषयी नवीन प्रारूप तयार करण्यात येणार आहे. या प्रारुपाची प्रत्यक्ष कार्यवाही होण्यापूर्वी त्यावर संबंधित घटकात व्यापक चर्चा व्हावी, या उद्देशाने शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद गुरुवारी दुपारी ४ ते ७ या वेळेत कर्वे रस्त्यावरील बाल शिक्षण शाळेच्या परिसरातील ‘आयएमसीसी’ संस्थेच्या सभागृहात होईल. डॉ. भूषण पटवर्धन हे या चर्चेचे प्रमुख प्रवर्तक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, गुणवत्ता व्यवस्था समिती समन्वयक, माजी कुलगुरुंना निमंत्रित केल्याची माहिती ‘सेडा’च्या कार्यकारी सदस्य डॉ. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92878 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..