अघोरी कृत्याप्रकरणी मांत्रिकाला बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अघोरी कृत्याप्रकरणी मांत्रिकाला बेड्या
अघोरी कृत्याप्रकरणी मांत्रिकाला बेड्या

अघोरी कृत्याप्रकरणी मांत्रिकाला बेड्या

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः व्यावसायिक वृद्धी व पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून पतीने पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर समाजातून टीकेचे पडसाद उमटले. आता या प्रकरणातील भोंदू बाबाला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ही कारवाई केली. मौलाना बाबा जमादार असे अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी पती, सासू, सासरे तसेच मांत्रिकाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा व्यावसायिक असून तो कात्रजजवळील आंबेगाव परिसरात राहतो. २०१३ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनीच पती, सासू, सासऱ्यांनी महिलेचा छळ करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान महिलेच्या आई-वडिलांनी महिलेच्या पतीकडे सोन्याचे दागिने व घराची कागदपत्रे ठेवण्यास दिली होती. मात्र पती व त्याच्या कुटुंबीयांनी या दागिन्यांचा परस्पर अपहार करत घराची कागदपत्रे एका बॅंकेत कर्जासाठी तारण ठेवली. या आधारे ७५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कालावधीत महिलेचा पती एका मांत्रिकाच्या संपर्कात आला. मांत्रिकाने त्यास, व्यवसायात भरभराट तसेच पुत्रप्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार करण्यास सांगत महिलेस सर्वांसमोर आंघोळ करायला लावली होती. या प्रकाराला कंटाळून महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पती, सासू - सासरे, मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92898 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..