एकत्रित परीक्षेमुळे सहाशे विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकत्रित परीक्षेमुळे सहाशे विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल
एकत्रित परीक्षेमुळे सहाशे विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल

एकत्रित परीक्षेमुळे सहाशे विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) सेवा पूर्व परीक्षा आणि बी. एड अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा एकाच दिवशी आलेल्या राज्यातील ६८१ विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल करून दिला आहे.

एमपीएससीची सेवा पूर्व परीक्षा आणि बी.एड आणि बी.एड (इलेक्टीव्ह) अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच दिवशी येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षाकडे सीईटीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून द्यावा, अशी विनंती केली. त्याची दखल घेत कक्षाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रकात आवश्यक तो बदल करून दिल्याचे परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी सांगितले. राज्य सरकारनेही या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखेबाबत पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना परीक्षा कक्षाला दिल्या होत्या. त्यानुसार एमपीएससीच्या रविवारी झालेल्या परीक्षेनंतर संबंधित विद्यार्थ्यांना सोमवार आणि मंगळवारच्या वेळापत्रकात सामावून घेण्यात आले. अशाप्रकारे बी.एड आणि बी.एड (इलेक्टीव्ह) ची प्रवेश परीक्षा देणाऱ्या एकूण ६८८ विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बदल करून देण्यात आला असून त्यातील सात विद्यार्थी एमपीएससी व्यतिरिक्त अन्य परीक्षा देणारे होते, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92944 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..