वीस वर्षीय अनर्घ्याची बाईकवर लडाखस्वारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ः ५०० सीसी बुलेटसह खारदुंगला पास केला सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीस वर्षीय अनर्घ्याची बाईकवर लडाखस्वारी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ः ५०० सीसी बुलेटसह खारदुंगला पास केला सर
वीस वर्षीय अनर्घ्याची बाईकवर लडाखस्वारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ः ५०० सीसी बुलेटसह खारदुंगला पास केला सर

वीस वर्षीय अनर्घ्याची बाईकवर लडाखस्वारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ः ५०० सीसी बुलेटसह खारदुंगला पास केला सर

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः जगातील सर्वात उंच वाहनांच्या रस्त्यांपैकी एक म्हणजे लेह-लडाखमधील खारदुंगला पास. समुद्रसपाटीपासून सुमारे १८,३०० फूट उंचीवर असणारे हे ठिकाण. बाईक चालवण्याची आवड असलेल्या प्रत्येकाचे इथे जाण्याचे स्वप्न असते, मात्र, अतिशय कमी व्यक्तींना हे स्वप्न पूर्ण करणे शक्य होते. या मोजक्या व्यक्तींच्या यादीत पुण्याच्या अनर्घ्या कडकोळ या तरुणीचा समावेश झाला आहे. अवघ्या विसाव्या वर्षी ५०० सीसी क्षमतेच्या बुलेटवर तिने नुकताच खारदुंगला पास सर केला.

विशेष म्हणजे, १३ ऑगस्टला खारदुंगला पासला पोहोचत आगळ्यावेगळ्या पद्धतीने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनर्घ्याने साजरा केला. अनर्घ्यासह २९ लोकांचा समूह होता. या समूहाने ११ ऑगस्टला श्रीनगरवरून प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर कारगिल, झोझिला, लेह, नुब्रा, पँगाँग, सरचू आणि मनाली असा प्रवास करत ते दोन दिवसांनी ते खारदुंगला पासला पोहोचले. या प्रवासात खडतर रस्ते, बिकट हवामान, पाण्याचे क्रॉसिंग, ऑक्सिजनचे कमी होत जाणारे प्रमाण अशी अनेक आव्हाने होती. मात्र, ही सर्व आव्हाने अनर्घ्याने विनासायास पार केली. या समूहाचे मार्शल बिपिन पांचोली यांनीही तिचे विशेष कौतुक केले.

‘‘मला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बाईकविषयी आकर्षण होते. वयाच्या अठराव्या वर्षी आई-वडिलांनी बुलेट घेऊन दिली आणि त्यानंतर माझी भ्रमंती सुरू झाली. पण, खारदुंगला पासला जाण्यापूर्वी फार मोठी बाईक राईड मी केली नव्हती. हिमालयात गाडी चालवण्याचा तर हा पहिलाच अनुभव होता. पण, प्रत्येक बाईकरप्रमाणे माझेही खारदुंगला पासला जाण्याचे स्वप्न होते. त्यातूनच या प्रवासाचे नियोजन केले. हा प्रवास यशस्वीरीत्याच पूर्ण करण्याचा आनंद आहे’’
- अनर्घ्याने कडकोळ
----------
सशस्त्र दलात जाण्याची इच्छा
अनर्घ्या कडकोळ सध्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. भविष्यात तिला भारतीय सशस्त्र दलात जाण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने तिने आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यासह तिला बाइकिंगची देखील आवड जोपासायची आहे. येत्या काळात पश्चिम भारतापासून ते पूर्व भारतापर्यंत म्हणजेच गुजरातपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत बाईकवर प्रवास करण्याची इच्छा आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन देशात विविध ठिकाणी फिरण्याची तसेच महिला बुलेट स्वारांचा समूह तयार करण्याचाही तिचा मानस आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92949 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..