आयसीएआय एमएसएमई यात्रेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयसीएआय एमएसएमई यात्रेला प्रतिसाद
आयसीएआय एमएसएमई यात्रेला प्रतिसाद

आयसीएआय एमएसएमई यात्रेला प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आझादी का अमृतमहोत्सवाच्या औचित्याने निघालेल्या आयसीएआय एमएसएमई सेतू आणि आयसीएआय एमएसएमई यात्रेला उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ही यात्रा मुंबईहून निघाली असून ७५ दिवस ७५ शहरात फिरून ७५ कार्यक्रमांतून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि योजनांची जागृती केली जात आहे, अशी माहिती आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए राजेश अगरवाल व पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष सीए सचिन बन्सल यांनी दिली.

या यात्रेचे शुक्रवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्वागत केले. यावेळी प्रीतेश मुनोत, अमृता कुलकर्णी, हृषिकेश बडवे, सचिन मिनीयार, मौसमी शहा, डॉ. संबीत मिश्रा, अभय दफ्तरदार, रवींद्र सोनवणे, दीपक करंदीकर, मनीष कुमार, महेश्वर मराठे, संतोष दोषी, श्रीकांत दंडवते, रवींद्र कामत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92974 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..