खंडणीप्रकरणी संतोष जाधव टोळीतील चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीप्रकरणी संतोष जाधव टोळीतील चौघांना अटक
खंडणीप्रकरणी संतोष जाधव टोळीतील चौघांना अटक

खंडणीप्रकरणी संतोष जाधव टोळीतील चौघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : व्यावसायिकाकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. जिशान इलाहीबक्ष मुंढे (वय २०), वैभव ऊर्फ भोला तिटकारे (वय १९, दोघे रा. आंबेगाव), सचिन तिटकारे (वय २२) आणि रोहित तिटकारे (वय २४, दोघे रा. नायफड, खेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी आरोपींना २९ ऑगस्टपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी संतोष जाधवसह एकूण बारा जणांविरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गावातील इंदिरानगर येथील व्यावसायिकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. जाधव याने या व्यावसायिकाकडे ‘व्हॉट्सअप कॉल’वर पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती; तसेच एका साथीदाराला व्यावसायिकाच्या ‘वॉटर प्लांट’वर पाठवून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी जिशान, वैभव, सचिन आणि रोहित या चौघांना अटक करत विशेष न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तुले जप्त केले आहे. आरोपींची संघटित टोळी तयार झाली असून, त्यांनी गुन्हेगारीतून बेकायदा कमविलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यात येणार आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93008 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..