यूपीतील भाजपच्या रॅली होत्या ‘हिटलिस्ट’वर ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रातून माहिती पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यूपीतील भाजपच्या रॅली होत्या ‘हिटलिस्ट’वर
‘एटीएस’ने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रातून माहिती पुढे
यूपीतील भाजपच्या रॅली होत्या ‘हिटलिस्ट’वर ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रातून माहिती पुढे

यूपीतील भाजपच्या रॅली होत्या ‘हिटलिस्ट’वर ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रातून माहिती पुढे

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी येथून अटक केलेल्या जुनैद व त्याचे साथीदार उत्तर प्रदेश व दिल्ली येथे घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर आता त्यांच्याकडून नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य, जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी या तीन प्रमुख व्यक्‍तींवर हल्ला करण्याचे तसेच उत्तर प्रदेशात भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचाही प्लॅन त्यांनी तयार केला असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रामधून ही माहिती पुढे आली आहे. ‘एटीएस’ने यापूर्वी चौघांना अटक केली असून, आणखी एका आरोपीच्या मागावर पथक आहे.

जुनैद हा मुळचा बुलडाणा येथील असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो समाजमाध्यमांतून जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर जुनैद व त्याचे साथीदार दिल्ली व उत्तर प्रदेशामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाने केलेल्या चौकशीतून पुढे आली.

भाजपच्या रॅलीवर हल्ल्याचा प्लॅन; मास्टरमाइंड पाकिस्तानात
उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या रॅली निघणार आहेत. त्यादृष्टीने जुनैद व त्याच्या साथीदारांनी भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचाही प्लॅन केला होता. त्यासाठी लागणारी स्फोटके बनविण्यासाठीच्या वस्तू व पैसे त्यांना थेट पाकिस्तानातील त्यांच्या मास्टरमाइंडकडून मिळणार होत्या. हा सर्व प्लॅन जुनैदच्या देखरेखीखाली सुरू होता, त्याचवेळी ‘एटीएस’ने त्यास ताब्यात घेतले.

सतरा बनावट फेसबुक खात्यांद्वारे सक्रिय
जम्मू-का‍श्मीरमधील दहशतवादी संघटनेशी जुनैद हा समाजमाध्यमांद्वारे संपर्कात आला होता. त्यांच्या संपर्कात आल्यानंतरही त्याने १७ बनावट फेसबुक खाती तयार करून तरुणांना या कटामध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधत होता.

कोण आहेत नरसिंहानंद सरस्वती, जितेंद्र नारायण व संदीप आचार्य?
नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबादमधील ‘शिवशक्ती धाम’चे महंत आहेत. त्यांच्याकडून हिंदू स्वाभिमान नावाची संस्था चालविली जाते. प्रक्षोभक भाषणांवरून त्यांची ओळख आहे. जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी हे उत्तर प्रदेश शिया वक्‍फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच सनातन धर्मात प्रवेश केला होता. तर गायक संदीप आचार्य हे योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक होते. एका वादग्रस्त गाण्याचे लेखक म्हणूनही ते परिचित आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93019 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..