शिक्षेसह कारवार्इपासून बचाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षेसह कारवार्इपासून बचाव
शिक्षेसह कारवार्इपासून बचाव

शिक्षेसह कारवार्इपासून बचाव

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : बेनामी व्यवहार (प्रतिबंध) या १९८८ च्या कायद्यात करण्यात आलेल्या बदलामुळे अनेक करदात्यांची शिक्षा आणि प्राप्तिकर विभागाकडून होणाऱ्या कारवार्इपासून बचाव होणार आहे. त्यामुळे हा बदल नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याची भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठाने या कायद्यात तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद असलेले कलम ३ (२) घटनाबाह्य व मनमानी आहे, असा निष्कर्ष काढत हे कलम रद्द केले आहे.


न्यायालयाने नेमके काय म्हटले?
- बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्यातील कलम ३ (२) घटनाबाह्य आणि मनमानी.
- तीन वर्षांच्या शिक्षेची तसेच दंडाची तरतूद रद्द करण्यात आली आहे.
- २०१६ च्या कायद्यानुसार सरकारला मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार पूर्वलक्षी असू शकत नाही.
- जुन्या प्रकरणांमध्ये २०१६ च्या कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही.
-----------------
बेनामी मालमत्ता म्हणजे काय?
बेनामी म्हणजे अशी मालमत्ता ज्याचे पैसे एक जण भरतो, परंतु ती दुसऱ्याचे नावे असते. ज्या व्यक्तीच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते त्याला ‘बेनामदार’ असे म्हणतात आणि ती मालमत्तेला बेनामी ठरवली जाते. ज्या व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे खर्चले आहे तो खरा या मालमत्तेचा मालक असतो आणि ज्याच्या नावे संपत्ती असते तो नामधारी असतो.
-----------------------
जप्त मालमत्ता परत कराव्या लागणार
कलम ३ (२) या कायद्याचे काम सध्या प्राप्तिकर विभाग पाहात आहे. त्या कलमाच्या आधारे विभागाने हजारो नोटिसा करदात्यांना पाठविल्या होत्या व अनेकांच्या जमिनी, गाड्या, बंगले, कार्यालये जप्त केली होती. ते आता परत द्यावे लागणार आहेत, अशी माहिती सनदी लेखापाल डॉ. दिलीप सातभार्इ यांनी दिली.
----------------
- ज्या करदात्यांवर एक नोव्हेंबर २०१६ पूर्वी केलेल्या बेनामी व्यवहाराबद्दल कारवाई केली जात आहे, त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. कारण बेनामी संपत्तीच्या कायद्यात २०१६ मध्ये करण्यात आलेली दुरुस्ती ही पुढच्या तारखांपासून लागू होईल. आधीपासूनच्या कारवार्इ त्यात येणार नाहीत.
- ॲड. अविनाश आव्हाड, ज्येष्ठ विधिज्ञ
----------------
कायद्यातील तरतूद पूर्वलक्षी तारखेपासून लागू करता येणार नाही, असा निवाडा दिल्याने हजारो बेनामी व्यवहारात अडकलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या डोक्यावर असणारी कारावासाच्या शिक्षेची टांगती तलवार आता दूर झाली आहे. या विभागाने आत्तापर्यंत चार हजार २०० कोटी रुपयांची बेनामी मालमत्तांना या वर्षात नोटिसा जारी केल्या आहेत. पुण्यातही अनेक करदात्यांना अशा नोटिसा मिळाल्या आहेत.
- डॉ. दिलीप सातभार्इ, सनदी लेखापाल
--

या नवीन दुरुस्तीद्वारे कोणत्याही जुन्या व्यवहारांना आता शिक्षा करता येणार नाही. या निर्णयातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायद्यातील तरतुदीत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. - ॲड. रितेश येवलेकर, सर्वोच्च न्यायालयातील वकील

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93045 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..