गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज
गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज

गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः राज्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले. मुंबईसह अन्य विभागातून सुमारे ३ हजार ४०० अतिरिक्त गाड्या धावणार आहे. पुणे विभागातर्फेही २६५ एसटी कोकणात सोडल्या जाणार आहेत. या सर्व गाड्यांचे आरक्षण सुरु झाले असून पैकी ७० टक्के गाड्या आताच भरल्या आहेत. यावरून यंदाच्या वर्षी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असल्याचे लक्षात येते.
कोरोनाच्या विघ्नामुळे दोन वर्ष गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन आखले गेले. राज्य परिवहन महामंडळाने देखील आपली तयारी पूर्ण केली आहे. जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. कोरोनापूर्वी २०१९ मध्ये एसटीने गणेशोत्सवासाठी २२०० गाड्या सोडल्या होत्या. यंदाच्या वर्षी यात १२०० गाड्यांची वाढ करण्यात आली. यंदा ३४०० गाड्या धावणार आहेत. यातील सुमारे ७० टक्के गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. शिवाय अनेकांनी ग्रुप बुकिंग देखील केले आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपले बुकिंग केले नाही, त्यांनी तत्काळ बुकिंग करावे असे आवाहन देखील एसटी प्रशासनाने केले आहे.

२८ व २९ सर्वाधिक गर्दी
३१ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापना होणार असल्याने २८ व २९ ऑगस्टला स्वारगेटसह अन्य बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने जास्तीत जास्त गाड्या प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे ठरविले आहे. कार्यशाळेत देखील गाड्या दुरुस्त करण्यावर भर दिला जात आहे. पुण्याहून ऑनलाइन आरक्षणासाठी १७० गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील १०० गाड्यांचे बुकिंग झाले आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची सोय व्हावी याकरिता एसटी महामंडळाने यंदा ३४०० गाड्यांचे नियोजन केले आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बहुतांश गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. जादासह टायमिंग गाड्या देखील उपलब्ध असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
- शिवाजी जगताप, सरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93069 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..