बाळकृष्ण औताडे यांचे निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळकृष्ण औताडे यांचे निधन वृत्त
बाळकृष्ण औताडे यांचे निधन वृत्त

बाळकृष्ण औताडे यांचे निधन वृत्त

sakal_logo
By

बाळकृष्ण औताडे
पुणे, ता. २४ ः सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तुळशीराम औताडे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. उरुळी देवाची गावात ते माजी ग्रामपंचायत सदस्य होते. बी. टी. औताडे अॅण्ड कंपनीचे ते मालक होत.

मुरलीधर केकाण
पुणे, ता. २४ ः कसबा पेठेतील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब उर्फ मुरलीधर शंकर केकाण (वय ७१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. पोलिस कर्मचारी अमित, अतुल व सागर केकाण यांचे ते वडील होत. ते उदय मंडळाचे माजी अध्यक्ष व श्री साईनाथ सत्यनारायण मंदिर ट्रस्टचे खजिनदार होते.

विजया कुलकर्णी
पुणे, ता. २४ ः विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी विजया दत्तात्रेय कुलकर्णी (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. महापालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी अध्यापन कार्य केले. आदर्श शिक्षिका पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सारसबाग येथील स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे त्यांनी अनेक वर्षे मोफत ज्योतिष मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93091 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..