आता ''तेजस्विनी''मध्ये पुरुषांना नो एन्ट्री! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता ''तेजस्विनी''मध्ये पुरुषांना नो एन्ट्री!
आता ''तेजस्विनी''मध्ये पुरुषांना नो एन्ट्री!

आता ''तेजस्विनी''मध्ये पुरुषांना नो एन्ट्री!

sakal_logo
By

पुणे, ता. २४ पीएमपी प्रशासन महिला प्रवाशांसाठी आणखी १० बस लवकरच रस्त्यांवर उतरविणार आहे. या बस केवळ महिलांसाठी राखीव असणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या बस शहराच्या विविध मार्गांवर धावतील. यासह महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी आता तेजस्विनी बसमधून केवळ महिला प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. पुरुषांना या बसमध्ये प्रवेश नसेल. तशा सूचनादेखील आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.

महिला प्रवाशांसाठी पीएमपीने तेजस्विनी बसची संकल्पना अमलात आणली. या बसमधून केवळ महिलांनाच प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र पीएमपीचे त्याकडे दुर्लक्ष झाल्यावर तेजस्विनीमधून पुरुष प्रवासीदेखील प्रवास करू लागले. परिणामी महिलांची छेडछाड तसेच दागिने चोरीला जाण्याच्या प्रकारांतदेखील वाढ झाली. याची गंभीर दखल घेत पीएमपी प्रशासनाने तेजस्विनीमध्ये पुरुषांना पूर्णपणे प्रवेश नाकारला आहे. कोणत्याही परिस्थितीत बसमध्ये पुरुष प्रवासी चढणार याची दक्षता घेण्याची तंबी चालक, वाहक यांच्यासह आगार व्यवस्थापकांना देण्यात आली.
-----------
शालेय विद्यार्थ्यांना मुभा
सकाळी व संध्याकाळी तेजस्विनी बसमध्ये महिलांची संख्या अधिक असते. मात्र दुपारच्या वेळी महिला प्रवासी संख्येने कमी असल्याने तोट्यात बस चालविण्यापेक्षा पुरुषांना प्रवास करू दिला जात होता. मात्र, आता ही बस केवळ महिलांसाठीच राखीव आहे, मात्र यातून शालेय विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तेजस्विनी बसमधून प्रवास करता येणार आहे.
---------------------
१५ मार्गांवर १९ बस
पीएमपीने तेजस्विनीसाठी एकूण १५ मार्ग निवडले आहे. त्यानुसार १५ मार्गांवर १९ बस धावत आहेत. याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. सप्टेंबरपासून यात आणखी १० बसची भर पडणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
---------------------
महिला प्रवाशांसाठी सकाळी व सायंकाळच्या सत्रात अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गाचा अभ्यास सुरू आहे. शिवाय तेजस्विनी बसमधून केवळच महिला प्रवाशांनी प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची तत्काळ अंमलबजावणी होईल.
- सुबोध मेडशीकर, महाव्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93194 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..