पुणे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अॅड . रांका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अॅड . रांका
पुणे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अॅड . रांका

पुणे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अॅड . रांका

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः शहरातील विविध प्रकारच्या ८२ व्यापारी संघटनाची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अॅड. फत्तेचंद रांका तर सचिवपदी महेंद्र पितळीया यांची नुकतीच निवड झाली आहे. २०२२ - २०२५ या कालावधीसाठी अध्यक्ष फतेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष नितीन काकडे, उपाध्यक्ष अरविंद कोठारी, सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव राहुल हजारे, सहसचिव यशस्वी पटेल, सहसचिव मिलिंद शालगर व खजिनदारपदी बॉबी मैनी, सहखजिनदार प्रमोद शहा तर, कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरेखा सांडभोर, सतीशचंद्र रहेजा, मनोज सारडा, मिठालाल जैन, हेमंत शहा , मनीष परदेशी, किशोर ओसवाल , जयंती जैन, कल्पेश शहा, घनश्याम सुराणा, आशिष जैन हे निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. देविदास साळी काम पाहिले. पुणे व्यापारी महासंघाची स्थापना १९९४ मध्ये झाली. सेल्स टॅक्स, व्हॅट, एलबीटी आदी कायद्याविरोधात महासंघाने यशस्वी लढा दिला आहे. ॲड. रांका हे पुणे सराफ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, जैन गोडवाड संघ, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष असून अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93268 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..