हलक्या पावसाची पुण्यात शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलक्या पावसाची पुण्यात शक्यता
हलक्या पावसाची पुण्यात शक्यता

हलक्या पावसाची पुण्यात शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान असले, तरी बहुतांश भागात पावसाची उघडीपच होती. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. गुरुवारी (ता. २५) आकाश सामान्यतः ढगाळ असेल, तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चिंचवड येथे सर्वाधिक ५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर शिवाजीनगर येथे १.८ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भात गुरुवारी (ता. २५) विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य राजस्थान आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापासून अजमेर, शिवपुरी, सिधी ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93303 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..