एन.डी.ए गेट-लवळे पीएमपी बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एन.डी.ए गेट-लवळे पीएमपी बस
एन.डी.ए गेट-लवळे पीएमपी बस

एन.डी.ए गेट-लवळे पीएमपी बस

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः प्रवाशांच्या मागणीचा विचार करता पीएमपी प्रशासनाने एन.डी.ए गेट ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे (मार्ग क्रमांक - १०६) या नवीन बस मार्गाचा प्रारंभ लवळे येथे केला. बुधवारी सकाळी सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते व पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बस सेवेचे उद्‍घाटन झाले.
यावेळी सिम्बॉयसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बॉयसिस हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नटराजन, डॉ. राजीव येरवडेकर, कोंढवे-धावडेचे सरपंच नितीन धावडे, लवळचे सरपंच, नितीन गावडे, उपेंद्र खाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या या मार्गावर चार बस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास बसच्या संख्येत वाढ केली जाईल. दिवसभरात चार बसच्या माध्यमातून ४० फेऱ्या होतील. एन.डी.ए गेट ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे पहिली बस सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी तर शेवटची बस रात्री ९ वाजून १० मिनिटांनी आहे. तसेच सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे ते एन.डी.ए गेट पहिली बस सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी आहे. तर शेवटची बस रात्री १० वाजता आहे. दर तीस मिनिटांनी बस धावणार असल्याचे दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93323 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..