पुणेकरांनो, कोणताही ताप अंगावर काढू नका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांनो, 
कोणताही ताप 
अंगावर काढू नका!
पुणेकरांनो, कोणताही ताप अंगावर काढू नका!

पुणेकरांनो, कोणताही ताप अंगावर काढू नका!

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : तुम्हाला ताप, सर्दी, खोकला असेल तर हा त्रास अंगावर काढू नका. विशेषतः गर्भवती, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांनी ही लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन शहरातील डॉक्टरांनी केले आहे.

काय आहे स्थिती
- शहरात गेल्या महिन्याभरापासून ताप, सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण
- पावसाळी हवा, ऊन-पावसाचा खेळ अशा वातावरण विषाणूंच्या उद्रेकास पोषक
- विविध विषाणूजन्य आजारांचा थैमान सध्या शहरात सुरू
- ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, थंडी वाजून येणे, डोके दुखी ही सामान्यतः सर्व विषाणूजन्य आजारांमध्ये दिसणारी लक्षणे

स्वाइन फ्ल्यूची चाचणीवर भर
डॉक्टर सुरवातीला कोरोनाची रोगनिदान चाचणी करण्याचा सल्ला देतात. त्यानंतर आतापर्यंत डेंगी, चिकुनगुणीया, हिवताप याची तपासणी केली जात होती. पण, आता श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे अशा लक्षणांची भर पडलेल्या रुग्णांची स्वाइन फ्ल्यूची चाचणी करण्यावर भर दिला जात असल्याची माहितीही वेगवेगळ्या डॉक्टरांनी दिली.


या बाबत संजीवन रुग्णालयाचे डॉ. मुकुंद पेनुरकर म्हणाले, ‘‘स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णांनी घरगुती उपचारांवर भर न देता तातडीने रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण, ही लक्षणे स्वाइन फ्ल्यूची असू शकतात. अशा रुग्णांना वेळेत प्रभावी उपचार मिळाल्यास ते पूर्णतः बरे होण्याची शक्यता वाढते. एक-दोन दिवस खूप ताप आलेल्या रुग्णांना स्वाइन फ्ल्यूवरील औषधे देण्यास प्राधान्य दिले जाते. त्यातून हे रुग्ण बरे होत आहेत.’’

बाह्य रुग्ण विभागात ताप, सर्दी, खोकल्याच्या तक्रारी घेऊन आलेल्या प्रत्येक रुग्णालाच स्वाइन फ्ल्यूची चाचणी करण्याचा सल्ला दिला जात नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण आणि गर्भवतींची चाचणी केले जाते. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार करून रुग्णाचे प्राण वाचविता येतात. त्यामुळे स्वाइन फ्ल्यूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. मुकुंद पेनुरकर, संजीवन रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93330 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..