अवयवदान ः अठ्ठावीस वर्षीय रिक्षाचालकाचा समाजासमोर आदर्श पाच जणांना मिळाले जीवनदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवयवदान ः अठ्ठावीस वर्षीय रिक्षाचालकाचा समाजासमोर आदर्श

पाच जणांना मिळाले जीवनदान
अवयवदान ः अठ्ठावीस वर्षीय रिक्षाचालकाचा समाजासमोर आदर्श पाच जणांना मिळाले जीवनदान

अवयवदान ः अठ्ठावीस वर्षीय रिक्षाचालकाचा समाजासमोर आदर्श पाच जणांना मिळाले जीवनदान

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : ‘मरावे परि र्किती रूपे उरावे’ असे म्हंटले जाते. चिखली येथील एका रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी या उक्तीला जागून समाजासमोर आदर्श घालून दिला. २८ वर्षीय रिक्षाचालकाच्या मुत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयदानास परवानगी दिल्यामुळे त्यातून पाच जणांना जीवदान मिळाले.

रिक्षाचालकाच्या मेंदूला मार लागल्याने पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात चार दिवसांपूर्वी (ता.२०) उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, ब्रेनडेड (मेंदूमृत्य) झाल्याने त्याच्या नातेवाइकांनी अवयवदानास परवानगी दिली. त्याच्या दोन किडनी, फुफ्फुस, ह्रदय, यकृत असे पाच अवयवांचे अवयवदान बुधवारी (ता. २४) सकाळी केले. या रिक्षाचालकाचे ह्रदय सुरतमधील बीडी मेदांता महावीर हार्ट इन्स्टिट्यूट येथील ३५ वर्षीय तरुणावर प्रत्यारोपित करण्यासाठी पाठवले. तर त्याचे फुफ्फुस हैद्राबाद येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलला ६० वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपित करण्यासाठी पाठवले. हे दोन्ही अवयव रिजनल ऑर्गन ट्रान्स्प्लांट ऑर्गनायझेशन (रोटो) व स्टेट ऑर्गन ॲंड टिश्यू ट्रांसप्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) द्वारे पाठवले. हे दोन्ही अवयवविमानाने पाठवण्यात आले. त्याची एक किडनी ही ग्रीन कॅरिडॉररद्वारे आणून ससून रुग्णालयात एका तरुणीवर प्रत्यारोपित केली. अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया बुधवारी यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून महिलेची प्रकृती व्यवस्थित आहे, अशी माहिती किडनी प्रत्यारोपण करणारे डॉ. सुरेश पाटणकर यांनी दिली. ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख व ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. सुरेश पाटणकर व पथकाने ही शस्त्रक्रिया केली. अवयवदात्या तरुणाची दुसरी किडनी ही डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील ३८ वर्षीय तरुणावर प्रत्यारोपित करण्यात आली. तर, त्याचे यकृत देखील तेथील ६० वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित केले आहे. अशा प्रकारे रिक्षाचालकांच्या कुटूंबियांमुळे पाच जणांना जीवदान मिळाले

यंदा पुणे विभागात २८ अवयवदान
डॉ डी. वाय. पाटील रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार अवयवदात्या तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी २० ऑगस्ट रोजी दाखल केले होते. उपचारा दरम्यान दुसऱ्या दिवशी ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतर आणि पोलिस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे अवयवदान बुधवारी सकाळी पार पडले. यावर्षी पुणे विभागात २८ अवयवदान झाले आहेत. अवयवदानातून तर ७९ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्याची, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93354 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..