मनसेच्या सभासद नोंदणीला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या सभासद नोंदणीला सुरवात
मनसेच्या सभासद नोंदणीला सुरवात

मनसेच्या सभासद नोंदणीला सुरवात

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला गुरुवारी पुण्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला प्रथम सदस्य नोंदणी करून देत सभासद करून घेतल्याबद्दल मी मनसेचे आभार मानतो, असे राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.

येथील नवी पेठेमधील मनसेच्या कार्यालयात आयोजित सदस्य नोंदणी अभियान उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राज्य सरचिटणीस अजय शिंदे, माजी नगरसेवक वसंत मोरे आणि गणेश सातपुते यावेळी उपस्थित होते. पुणे मनसेच्यावतीने राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ऑपरेशन झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदा पुण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते जमले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.
ठाकरे म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत सदस्य नोंदणीची सुरवात मुंबईत करण्यात आली होती. यंदा प्रथमच ती पुण्यात करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दर तीन ते चार वर्षांनी नाव नोंदणी करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्वांना मी आवाहन करतो की,त्यांनी मनसेचे सदस्य व्हावे. जे सदस्य होतील त्यांना दर आठवड्याला पक्षाची माहिती, कार्यक्रम आणि विविध विषयांची माहिती मोबाईलवर पाठवण्यात येईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93576 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..