बार्टीच्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार्टीच्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
बार्टीच्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

बार्टीच्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. एम.फील अथवा पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत ही अधिछात्रवृत्ती देण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंत कायम नोंदणी असणाऱ्या, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली. एकूण २०० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येईल.
संकेतस्थळ ः https://barti-maharashtragov.in

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93627 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..