दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई
दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई

दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : येरवड्यात दहशत पसरविणाऱ्या स्वप्नील किसन भालेकर (वय २७) या सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार कारवाई केली. त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. स्वप्नील हा सराईत गुन्हेगार असून विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी परिसरात त्याने दहशत पसरवली असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कृत्ये सुरूच असल्याने त्याच्यावर कारवाई केली आहे.


रूग्णांसह कर्मचाऱ्यांची फसवणूक
पुणे, ता. २५ ः ‘‘मी मुख्यमंत्री कार्यालयातून (सीएमओ) डॉक्टर बोलतोय. रुग्णाच्या उपचारासाठी औषधांची गरज आहे. मी ते खरेदी करतो. त्यासाठी दिलेल्या क्रमांकावर तत्काळ पैसे पाठवा,’’ असे सांगून रुग्णांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला.
याप्रकरणी एका डॉक्टरने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी ससून रूग्णालयात डॉक्टर असून २२ ऑगस्ट रोजी कामावर होते. त्यावेळी एकाने दूरध्वनी करून मी ‘सीएमओ’मधील डॉक्टर बोलत असल्याची बतावणी केली. त्याशिवाय ससूनमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना लवकर रुग्णवाहिका मिळवून देण्यासाठी ६ हजार ३०० रुपये वर्ग करून घेत फसवणूक केली. तसेच, ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना बदली न करण्यासाठी पैशांची मागणी करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93643 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..