महिलेवर अत्याचार; पोलिसाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेवर अत्याचार; पोलिसाला अटक
महिलेवर अत्याचार; पोलिसाला अटक

महिलेवर अत्याचार; पोलिसाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः शहर पोलिस दलातील एका महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०२० ते २०२२ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी संदीप कुंडलिक जाधव (वय २८, रा. पुणे) याला अटक झाली. संदीपची महिलेसोबत ओळख होती, त्यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याशिवाय त्याचे इतर मुलींशी अनैतिक संबंध होते. याबाबत फिर्यादी महिलेने विचारणा केल्यानंतर तो त्यांना मारहाण करत होता. तसेच, लग्न न करता त्यांची फसवणूक केली. सतत होणारा त्रास आणि लग्न करत नसल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संदीपला अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93672 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..