पावसाची उघडीप शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाची उघडीप शक्य
पावसाची उघडीप शक्य

पावसाची उघडीप शक्य

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः जिल्ह्यासह राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाची मुख्यतः उघडीप राहील, तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरात महिनाअखेरपर्यंत तरी आकाश अंशतः ढगाळ तर दुपारनंतर हलक्या सरी अपेक्षीत आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. २६) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य राजस्थान आणि पाकिस्तान परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापासून राजस्थान, साजापूर, वाराणसी, गया, बंकूरा, दिगा ते उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93680 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..