खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : दोन गटांत झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून आणि गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी किरण दिलीप मोरे (वय २६, रा. कोरेगाव पार्क) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याबाबत मानव कर्पे (वय २४, रा. बालाजीनगर) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास कात्रज येथे घडली. घटनेच्या दिवशी आरोपी किरण मोरे आणि सूरज शेजवळ यांनी फिर्यादीला अडविले. ‘तू आमच्या भांडणात का आला, आम्ही तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत किरण मोरे याने फिर्यादी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला आणि सूरज शेजवळने त्याचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी किरण मोरेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93700 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..