सिद्धार्थनगरमधील पुनर्वसनाचा मुद्दा विधानसभेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थनगरमधील पुनर्वसनाचा मुद्दा विधानसभेत
सिद्धार्थनगरमधील पुनर्वसनाचा मुद्दा विधानसभेत

सिद्धार्थनगरमधील पुनर्वसनाचा मुद्दा विधानसभेत

sakal_logo
By

पुणे,ता. २५ : राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान भू-संपादनासाठी घरे खाली करणाऱ्या सिद्धार्थनगर मधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यास पुणे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. या लोकांना घरे कधी दिली जाणार, असा प्रश्‍न आमदार सुनील टिंगरे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला.

पुणे शहरात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरम्यान लोहगाव विमानतळ ते नगररोड दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. यावेळी पुणे मनपाचे आयुक्त म्हणून प्रवीणसिंह परदेशी कार्यरत होते. परदेशी यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जवाबदारी देखील होती. विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील काही घरे रस्ता रुंदीकरणात बाधा आणत होती. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देवून तेथील १३८ घरे व १५ दुकानांची जागा संपादित केली गेली. नागरिकांनी देखील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लगेचच घरांचा ताबा दिला. त्यानंतर आता १४ वर्षे झाल्यावरसुद्धा नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. महापालिका आणि प्राधिकरण एकमेकांकडे बोटे दाखवत आहे. या लोकांचा वनवास कधी संपणार असा प्रश्‍न टिंगरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व लोकांना लवकरात लवकर घरे मिळावीत, यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी मागणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93703 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..