पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी
पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी

पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आरक्षीत असलेल्या पाषाण तलावाच्या परिसरात अविवाहित जोडप्यांना बसण्यास, फिरण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्याने व सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घातल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
पुणे महापालिकेतर्फे व परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटनांतर्फे पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात मैलापाणी येऊ नये, जलपर्णी वाढू नये, परिसरातील जैवविविधता कायम राहावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाषाण तलावाच्या परिसरात वृक्षांची संख्या मोठी असल्याने तेथे विविध जातीच्या पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड असणारे नागरिक पाषाण तलावाच्या परिसरात फिरत असतात. याच ठिकाणी प्रेमी युगुल फिरण्यासाठी येतात, पण त्यांच्यामुळे पक्षी निरीक्षणामध्ये अडथळे येत आहेत. तसेच हा तलावाचा परिसर मोठा असल्याने सुरक्षेचा प्रश्‍नही येत आहे, त्यामुळे ही बंदी घातली आहे.

पाषाण तलावात आत्तापर्यंत दोन मृतदेह आढळले आहेत. तेथे प्रेमी युगुल किंवा अविवाहित जोडप्यांमुळे वाद विवाद होऊ शकतात. महापालिकेची तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनाही अडथळा होत असल्याने त्यांना पाषाण तलावाच्या परिसरात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इतर सर्व उद्याने जोडप्यांसाठी खुली आहेत.
- अशोक घोरपडे, उद्यान अधिक्षक, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93708 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..