... तर दलित पॅंथर सत्तेत आली असती ः आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

... तर दलित पॅंथर सत्तेत आली असती ः आठवले
... तर दलित पॅंथर सत्तेत आली असती ः आठवले

... तर दलित पॅंथर सत्तेत आली असती ः आठवले

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः भारतीय दलित पँथर एकसंध राहिली असती तर महाराष्ट्रात पँथरचे सरकार आले असते. पण रिपाईंच्या सर्व गटांचे ऐक्य करण्यासाठी भारतीय दलित पॅंथरची चळवळ नाइलाजाने संपुष्टात आणावी लागली, अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी (ता.२५) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. ही चळवळ पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार आदींशी चर्चा करू, असेही ते म्हणाले.

भारतीय दलित पॅंथरच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पॅंथर सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आठवले यांच्या हस्ते या चळवळीतील दिवंगत कार्यकर्त्यांच्या नातेवाइकांचा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दलित पँथरचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, दिलीप जगताप, सुखदेव सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, रिपाईचे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे, आयुब शेख, महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले, ‘‘ही जगभर पोचणारी एकमेव चळवळ होती. ती सातत्याने अन्याय, अत्याचार विरोधी आणि दलितांसाठी काम करणारी चळवळ होती. दलित पॅँथरने मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारलेला नामांतर लढा, गायरान जमीन हक्क लढा,मंडल आयोग प्रश्न, शहरातील झोपड्यांना आधार, दलित-आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी केलेली विविध आंदोलने आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.’’

दलित पॅंथर ही जगातील एकमेव अशी चळवळ होती, जी लेखकांनी उभारली होती आणि या चळवळीचे नेतृत्व लेखक, कवी, साहित्यिक करत होते, असे मत अर्जुन डांगळे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी आठवले यांच्या हस्ते माजी उपमहापौर दिवंगत नवनाथ कांबळे, रवींद्र गांगुर्डे, चिंतामण कांबळे यांच्या नातेवाइकांचा आणि पँथर चळवळीत योगदान देणारे भगवान वैराट,बाबूराव घाडगे, वसंत बनसोडे, प्रतिभा गायकवाड आदींसह पँथर चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या पँथर कार्यकर्त्यांना पँथर पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘ढसाळ यांच्या स्मारकासाठी प्रयत्न’

दलित पॅंथरचे संस्थापक दिवंगत नामदेव ढसाळ यांचे मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर (ता. राजगुरुनगर) हे आहे. त्यामुळे ढसाळ यांच्या गावी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी काही नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना केली. त्यानंतर ढसाळ यांच्या स्मारकासाठी निधी आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जाईल, असे आश्‍वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

८६८३८

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93711 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..