मावा मोदकास नागरिकांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावा मोदकास नागरिकांची पसंती
मावा मोदकास नागरिकांची पसंती

मावा मोदकास नागरिकांची पसंती

sakal_logo
By

स्वारगेट, ता. २६ : गणपती बाप्पा आठ दिवसांनी आगमन करणार असल्याने भाविकांची गणपतीच्या सजावटीसाठी बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. नैवेद्यासाठी मिष्टान्न व सजावटीसाठी गोड पदार्थास भाविकांची मोठी मागणी आहे. गणपतीचा आवडता नैवेद्य असलेल्या विविध प्रकारच्या मोदकास ग्राहकांनी पसंती दिली आहे. मावा मोदक हा सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.
दोन वर्षे कोरोना असल्यामुळे भाविकांनी खर्चात हात आखडता घेतला होता. त्याचा आपसूकच परिणाम मिठाई व्यवसायावर झाला होता. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन ते चार पट भाविकांची संख्या मिठाई खरेदी करण्यास वाढली असल्याने व्यावसायिक आनंदात आहेत. काजू मोदक, मलई मोदक, चॉकलेट फ्लेवर मोदक, स्ट्रॉबेरी मोदक, काजू ब्लूबेरी मोदक, काजू केशर मोदक, चॉकलेट मोदक या प्रकारच्या मोदकांना भाविकांची मोठी मागणी आहे. त्याचबरोबर काजू गजग, काजू बाईट, काजू रोजकातली, ब्ल्यूबेरी कतली, काजू पान, काजू गिलोरी, ड्रायफूट सँडविच याही मिठाईला भाविकांनी पसंती दर्शवली आहे.
पेरू बर्फी, मावा बर्फी, सीताफळ मावा बर्फी, चंद्रकला साखरी पेढा, मलई पेढा, मलई केशरी पेढा, काजू केशर पेढा, विविध चिवड्यांचे प्रकार, मठरी खारी पुरी, मेथी भाकर वडीला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या प्रकारची मागणी होत आहे. गौरीसाठी फराळाच्या विविध प्रकारालाही मोठी मागणी होत आहे. शंकरपाळी, अनारसे, लाडू, विविध प्रकारच्या बर्फी, सोनपापडी, बालुशाही याही मिठाईस ग्राहक खरेदी करण्यास पसंती देत आहेत.

भावात वाढ, तरीही प्रतिसाद
तेल, तूप, दूध व जीएसटी पाच टक्क्याहून १२ टक्के झाल्याने मिठाईच्या भावात पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे. तरीही भाविकांचा मिठाई खरेदी करण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पुण्याच्या बाहेरून येणारा आमचा मोठा ग्राहक आहे. वर्षानुवर्षे हा ग्राहक आमच्याशी जोडला आहे. दर्जेदार मिठाई हीच आमची ओळख आहे.
- महेंद्र गाढवे, काका हलवाई

गेल्या दोन वर्षांतील झालेले नुकसान या वर्षी भरून निघेल अशी आशा आहे. भाविकांचा प्रतिसाद चांगला आहे. कोणताही सण म्हटलं की भाविक आपोआप आमच्या मिठाईला प्राधान्य देतात. तो विश्वास आम्ही जपला आहे.
- केदार चितळे, चितळे मिठाई

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93775 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..