कापसाची पेरणी झाली अद्ययावत ‘रोबॉटिक्स’ने विकसित केलेले यंत्र वाचवतेय शेतकऱ्यांचे श्रम व पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापसाची पेरणी झाली अद्ययावत
‘रोबॉटिक्स’ने विकसित केलेले यंत्र वाचवतेय शेतकऱ्यांचे श्रम व पैसे
कापसाची पेरणी झाली अद्ययावत ‘रोबॉटिक्स’ने विकसित केलेले यंत्र वाचवतेय शेतकऱ्यांचे श्रम व पैसे

कापसाची पेरणी झाली अद्ययावत ‘रोबॉटिक्स’ने विकसित केलेले यंत्र वाचवतेय शेतकऱ्यांचे श्रम व पैसे

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : शेती आणि काबाडकष्ट या दोन्ही बाबी आजही अनेक भागांतील शेतकरी अनुभवत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान न मिळाल्याने शेतीचे उत्पादन वाढविण्यात तसेच पिकांची मशागत करण्यात अडचणी येतात. हे सर्व जमले तरी निसर्गाने साथ दिली पाहिजे. नाहीतर हातातोंडाशी आलेले पीकदेखील वाया जाते. शेतकऱ्यांच्या या व्यथा समजून घेत त्यांना हायटेक सामग्री पुरवीत त्यांचे श्रम कमी करण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग सध्या देशात होत आहेत.

जगाच्या पोशिंद्याचे काबाडकष्ट आणि पेरणीतील अडचणी कमी करण्यासाठी अनेक स्टार्टअप सध्या कार्यरत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘रोबोटिक्स एगटेक प्रा. लि.’ (Robotix) हे स्टार्टअप शेतीमधील योग्य उपकरणांची कमतरता आणि कामगारांच्या उपलब्धतेमुळे येणारी अडचण दूर करण्यासाठी रोबोटिक शेती उपकरणे विकसित करते. पेरणीचे उपकरण हे त्यांचे प्रमुख उत्पादन आहे. पेरणी करण्यासाठी सध्या जी अवजारे वापरली जातात त्यातील अचूकता, वापरातील लवचिकता आणि विश्वासार्हता नसल्यामुळे बियाणे आणि जमीन वाया जाते. बियाणांच्या जास्त किमतीमुळे ती वाया जाणे शेतकऱ्यांना परवडत नाही. स्टार्टअपने तयार केलेल्या यंत्राने ते नुकसान टाळते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. अविनाश कराळे आणि दीपक रेड्डी यांनी २०१६ मध्ये या स्टार्टअपची स्थापना केली. कराळे यांनी पुणे विद्यापीठातून बीई ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी घेतली तर रेड्डी यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी लॉग बीच मधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमएस पदवी आणि पुणे विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये बीर्इ ही पदवी मिळवली आहे.

स्टार्टअप नेमके करते काय
कापसाच्या पेरणीसाठी रोबोटिक्सने ट्रॅक्‍टरवर चालणारे इलेक्ट्रॉनिक पेरणी यंत्र तयार केले आहे. बियाणे जमिनीत अचूक पेरण्याची अनोखी पद्धत या स्टार्टअपने विकसित केली आहे. या अवजारात ग्राउंड व्हील ब्रेकिंग यंत्रणा आहे. जे बियाणे वाया जाण्यापासून थांबवते. तसेच याच्या वापरातून शेतकरी सहजपणे दोन भिन्न पिके एकाच वेळी लावू शकतात. उपकरणाच्या सेटअपसाठी प्रयत्न आणि वेळ कमी लागतो. स्टार्टअपला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे मार्गदर्शन मिळाले आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.

स्टार्टअपने केलेल्या सर्व्हेतील महत्त्वाची आकडेवारी
- गेल्या पाच वर्षांत ३० लाखांहून अधिक ट्रॅक्टर विकले गेले
- त्यातील केवळ ३० टक्के शेतकऱ्यांकडे अद्ययावत पेरणी यंत्र
- सत्तर टक्के शेतकरी पेरणीसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या प्रतीक्षेत

हे पेरणी यंत्र वापरणे अगदी सोपे आहे. पेरणीतील अंतर निश्‍चित करण्यासाठीची यंत्रणादेखील अद्ययावत आहे. त्यामुळे पेरणी सोपी होते. पारंपरिक पद्धतीने पेरणी करीत असताना बिया कमीअधिक प्रमाणात पडायच्या. त्यामुळे पीक नीट येत नव्हते. त्यात मोठा वेळ जात आणि मजुरीदेखील मोजावी लागत असे.
- सुभाष तायडे, शेतकरी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93777 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..