‘सह्याद्री’वरून उलगडणार पुण्याचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सह्याद्री’वरून उलगडणार पुण्याचा इतिहास
‘सह्याद्री’वरून उलगडणार पुण्याचा इतिहास

‘सह्याद्री’वरून उलगडणार पुण्याचा इतिहास

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा पुणे शहराचा इतिहास आता सह्याद्री वाहिनीवरून उलगडणार आहे. दूरदर्शन, पुणे निर्मित ‘आपलं पुणं’ ही मालिका येत्या रविवारपासून (ता. २८) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे. यासह परदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या मराठी व्यक्तींचा प्रवास ‘ग्लोबल मराठी’ या मालिकेतून सोमवारपासून (ता. २९) दाखवण्यात येणार आहे.

दूरदर्शन आणि आकाशवाणी, पुणेचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजित बागल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी आकाशवाणी पुणे केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन उपस्थित होत्या. ‘‘सुमारे ५० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीच्या खुणा पुण्यामध्ये सापडल्या आहेत. तत्कालीन पुण्यापासून ते आज आयटी आणि मेट्रोच्या पुण्यापर्यंतची वाटचाल आणि त्यासह पुण्यातल्या महत्त्वाच्या वास्तू, व्यक्ती, पुण्यावर आलेली संकटे, पुणेकरांनी त्यावर केलेली मात, इथे घडलेले महत्त्वाचे प्रसंग या सर्वांचा मागोवा ‘आपलं पुणं’ या मालिकेत घेतला जाणार आहे. दर रविवारी सायंकाळी ६.३० वाजता या मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे. तर, महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती नोकरी-व्यवसायानिमित्त जगातल्या विविध देशांमध्ये वास्तव्याला आहेत. मुलाखतींद्वारे त्यांची यशोगाथा ‘ग्लोबल मराठी : संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी’ या मालिकेतून उलगडणार आहे. दर सोमवारी रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे,’’ असे बागल यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93852 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..