नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक
नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः खासगी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणाची ऑनलाइन माध्यमाद्वारे १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभिषेक सिंग व त्याचा साथीदार संजू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे उच्चशिक्षित असून, ते सध्या नोकरीच्या शोधात आहेत. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. त्याने फिर्यादीस एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर सिंगने तरुणाला एक लिंक पाठविली. त्यानुसार, फिर्यादी तरुणाने संबंधित लिंकमध्ये वैयक्तिक व गोपनीय माहिती भरली. तसेच फिर्यादीने ऑनलाइन माध्यमाद्वारे सिंग याने सांगितलेल्या बॅंक खात्यात वेळोवेळी आठ लाख रुपयांची रक्कम भरली. त्यानंतरही नोकरी न मिळाल्याने फिर्यादी यांनी सिंगच्या मोबाईलवर संपर्क साधला. सिंग व संजू या दोघांनी आणखी चार लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93877 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..