गरजूंना सायकली भेट देण्याचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजूंना सायकली भेट देण्याचा उपक्रम
गरजूंना सायकली भेट देण्याचा उपक्रम

गरजूंना सायकली भेट देण्याचा उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः सूर्यनगरी सोसायटीमध्ये वापरात नसलेल्या व पडून असलेल्या सायकल दुरुस्त करून गरजूंना भेट देण्याचा उपक्रम राबविला गेला. हा उपक्रम अश्विन शिंदे मित्र परिवाराच्या वतीने राबविण्यात आला. सोसायटीतील प्रमेश विवेक गोरे यांनी या मोहिमेला प्रतिसाद देत उत्तम स्थितीत असलेला संगणक भेट दिला. त्याचबरोबर गणेश बारटक्के यांनी त्यांची मुलगी वालिशा हिची सायकल दिली. तर विराज ढोकळे व अस्मि कुलकर्णी यांनीही त्यांच्या सायकली दिल्या. कार्यक्रमाला वरुण सर्वगोड, कल्पना जगताप, यश घाळे, नूतन गोरे, शीतल ढोकळे सुनीता पानसरे, जतीन जाळिंद्रे, प्रशांत हुमणे हे उपस्थित होते. यातील दोन सायकली समाजसेवक मिलिंद भोई यांनी भेट दिल्या आहेत.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93900 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..