क्रेडाई महाराष्ट्रतर्फे पहिले महिला अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रेडाई महाराष्ट्रतर्फे पहिले महिला अधिवेशन
क्रेडाई महाराष्ट्रतर्फे पहिले महिला अधिवेशन

क्रेडाई महाराष्ट्रतर्फे पहिले महिला अधिवेशन

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : महिला बांधकाम व्यावसायिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडाई-महाराष्ट्राच्या विमेन्स विंगतर्फे फेमिकॉन २०२२ हे एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ६२ शहरातून सुमारे २२५ महिला उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला. विमेन्स विंगच्या निमंत्रक सपना राठी व त्यांच्या टीमच्या संकल्पनेतून व नियोजनबद्ध आखणीतून हे अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. यावेळी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, क्रेडाई-महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे, प्रेसिडेंट इलेक्ट प्रमोद खैरनार, सचिव सुनील कोतवाल, खजिनदार शशिकांत जीड्डीमनी, उपाध्यक्ष रवी कडगे, स्मरणपत्रिका समितीचे निमंत्रक आनंद पाटील, क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी महिला उद्योजिकांना मार्गदर्शन केले.
सतीश मगर व शांतिलाल कटारिया यांनी प्रत्येक संस्थेत महिला निभावत असलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच हे अभिनव व आदर्शवत अधिवेशन अतिशय नियोजनबद्धतेने भरविल्याबद्दल विमेन्स विंगच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी दीपाली गांधी, अश्विनी देशपांडे, सपना मिरजकर, आदिती सिरसीकर, रश्मी जोशी, श्वेता भारतीय, सोनल पोखरना, ज्योती ठक्कर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93905 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..