सिग्नलवरील शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिग्नलवरील शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली
सिग्नलवरील शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली

सिग्नलवरील शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः शाळा सुरू होऊन दोन महिन्यानंतरही शहरातील ४५ सिग्नलवर तब्बल १९३ शालाबाह्य विद्यार्थी आढळून आले आहेत. सिग्नलवर भीक मागणारे व वस्तू विकणाऱ्या या शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढतच असल्याचे सर्व सेवा संघाच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनात्मक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. संघाचे मॅथ्यू कोराट्टिईल सांगतात, ‘‘शहरातील अति जोखमीच्या किंवा धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी आम्ही काम करतो. शहरातील अनेक सिग्नलवर भिक्षा मागणारे व वस्तू विकणारे शालाबाह्य विद्यार्थी आढळले आहेत. सहा वर्षांवरील मुलांचे आम्ही सर्वेक्षण केले असून, त्यांच्या शिक्षणाची व पुनर्वसनाची गरज आहे.’’ सहा वर्षांखालील मुले पालकांसमवेत भिक्षा मागतानाही दिसत आहे, त्यांची संख्या अधिक असल्याचेही मॅथ्यू यांनी सांगितले.

सर्वेक्षणाचे निष्कर्ष
- जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील सिग्नलवरील मुलांची संख्या वाढली
- सहा वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिक
- मुले भिक्षा मागणे आणि वस्तू विकण्याचे काम करतात
- लहानमुलांना कडेवर घेऊन भीक मागणाऱ्यांची संख्या जास्त

महत्त्वाच्या सिग्नलवरील मुलांचा तपशील
सिग्नलचे नाव ः जुलैच्या (ता. १ ते १५) ः ऑगस्ट (१ ते १३)
शिवाजीनगर न्यायालय ः ५ ः ५
मनपा ः ८ ः २०
एफसी महाविद्यालय ः ६ ः ०
मुंढवा ः ४ ः १७
जुना बाजार ः ४ ः १७
एकूण संख्या ः ९० ः १९३

‘‘जुलै महिन्यातील सर्वेक्षणात आम्हाला ३५ सिग्नलवर ९० मुलांच्या संख्येची माहिती मिळाली. ही माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे दिली आहे. सिग्नल, बसथांबा, रेल्वेस्थानक आदींवरील शालाबाह्य मुलांची संख्या कैक पटीने वाढली आहे.’’
- फादर मॅथ्यू कोराट्टिईल-, सर्व सेवा संघ मॅथ्यू

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93935 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..