पत्नीला पेटवून देणाऱ्या पतीला जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला पेटवून देणाऱ्या पतीला जन्मठेप
पत्नीला पेटवून देणाऱ्या पतीला जन्मठेप

पत्नीला पेटवून देणाऱ्या पतीला जन्मठेप

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत तिचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निकाल दिला.
गणेश शंकर पासलकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पुरंदर तालुक्यातील भिवरी परिसरात १९ सप्टेंबर २०१५ रोजी पहाटे साडेचार वाजता हा प्रकार घडला होता. मनिषा गणेश पासलकर (वय २०, रा. भिवरी, पुरंदर) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. आगीत होरपळलेल्या पत्नीने रुग्णालयात दाखल असताना जबाब दिला होता. त्या जबाबावर आधारित असलेल्या या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. हांडे यांनी नऊ साक्षीदार तपासले. संपूर्ण खटला मृत्युपूर्व जबाबावर आधारित होता. त्यात घटनेपूर्वी व नंतरच्या साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. मला खोट्या गुन्ह्यात अटक केली आहे, असा बचाव आरोपीने केला होता. तो न्यायालयाने मान्य केला नाही. तत्कालीन सहायक फौजदार नवनाथ सस्ते यांनी गुन्ह्याचा तपास केला. सहायक फौजदार शशिकांत वाघमारे, सहायक उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94004 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..