दोन महिन्यांनंतर पुणेकरांना सूर्यप्रकाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन महिन्यांनंतर पुणेकरांना सूर्यप्रकाश
दोन महिन्यांनंतर पुणेकरांना सूर्यप्रकाश

दोन महिन्यांनंतर पुणेकरांना सूर्यप्रकाश

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुणेकरांनी शुक्रवारी निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाची अनुभूती घेतली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहर व परिसरात सामान्यतः ढगाळ वातावरण असून, सततच्या पावसामुळे पुणेकर हैराण झाले होते. आता पुढील दोन ते तीन दिवस तरी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
राज्यभरात आता पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. शहरात शुक्रवारी दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होते. तर एखाददोन ठिकाणी हलका पाऊस पडला. शहरातील विविध केंद्रांवर दिवसभरात शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी (ता. २७) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वायव्य राजस्थान आणि पाकिस्तान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा कमी दाबाच्या क्षेत्रापासून राजस्थान, सिकार, सुलतानपूर, देहरी, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. झारखंड आणि परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94021 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..