मूर्तीच्या माती संकलनासाठी ‘पुनरावर्तन’ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्तीच्या माती संकलनासाठी ‘पुनरावर्तन’ उपक्रम
मूर्तीच्या माती संकलनासाठी ‘पुनरावर्तन’ उपक्रम

मूर्तीच्या माती संकलनासाठी ‘पुनरावर्तन’ उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः कोरोनानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव निर्बंधाशिवाय साजरा केला जाणार असला, तरी
नागरिकांनी सुरक्षित, प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक साजरा करावा. शाडूच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ती माती संकलन करण्यासाठी केंद्र स्थापन केले जाणार आहेत. नागरिकांनी ही माती तेथे जमा करावी. यासाठी सामाजिक संस्थांच्या सह्याने उपक्रम राबविला जात असून, त्यास ‘पुनरावर्तन’ असे नाव देण्यात आले आहे.

यंदाचा गणेशोत्सव ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून
विसर्जन घाट, हौद, टाक्या, निर्माल्य संकलन केंद्र, मुर्ती संकलन केंद्र, गणेशोत्सवातील दैनंदिन स्वच्छता यासाठी तयारी सुरू केली आहे.

गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी महापालिकेकडून शहरात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी, महापालिकेने नागरिकांना शाडूच्या मुर्ती वापरण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करताना रसायन वापरले जातात त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. महापालिका शाडू मूर्तीच्या मुर्ती पालिकेच्या विसर्जन हौदावर विसर्जित केल्यानंतर अथवा घरी विसर्जन केल्यानंतर नागरिकांकडे राहणारी शाडूची माती संकलित करणार असून, त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तसेच, महापालिकेच्या विसर्जन घाटांच्या ठिकाणीही या मातीची संकलन केंद्र उभारली जाणार आहे. शहरातील स्वयंसेवी संस्था आणि महापालिका अशा प्रकारचा उपक्रम यंदा पहिल्यांदाच राबवीत असून त्याला ‘पुनरावर्तन’ हे नाव देण्यात आले आहे.
-----------
यंदाही मूर्ती संकलन केंद्र
महापालिकेकडून मूर्ती विसर्जनाला पर्याय म्हणून मुर्तीदान करण्याचे आवाहन केले. त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येत असून, यंदाच्या वर्षीही अशी केंद्र उभारली जाणार आहेत. याची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. उत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत निर्माल्य संकलनासाठीही व्यवस्था उभी केली आहे. या निर्माल्याचे सेंद्रिय खत करून ते शेतकऱ्यांना व उद्यानांसाठी दिले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
-----------