नंदुरबारमधील पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबारमधील पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई
नंदुरबारमधील पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई

नंदुरबारमधील पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः नंदुरबार येथे पोलिस अधिकाऱ्याकडून झालेल्या मारहाणीप्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आदेश दिल्यानंतर अखेर पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याची बदली केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्‍यातील महिलेस पोलिस उपनिरीक्षक राहू पैसाने यांनी मारहाण केली होती. हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी या प्रकरणाबाबत डॉ.गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर डॉ.गोऱ्हे यांनी नंदुरबार पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पैसाने यांची चौकशी करून त्यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली केली. पैसाने यांची विभागीय चौकशी सुरु केली असून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात आली असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी उपसभापती कार्यालयास कळविली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94056 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..