ॲड. मधुकर कुलकर्णी यांना साहित्य लोभसतर्फे जीवनगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. मधुकर कुलकर्णी यांना 
साहित्य लोभसतर्फे जीवनगौरव
ॲड. मधुकर कुलकर्णी यांना साहित्य लोभसतर्फे जीवनगौरव

ॲड. मधुकर कुलकर्णी यांना साहित्य लोभसतर्फे जीवनगौरव

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : आयकर तसेच करविषयक कायद्यातील ज्येष्ठ वकील ॲड. मधुकर कुलकर्णी यांना साहित्य लोभस परिवारातर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सी.ए. सुधीर पंडित, सी.ए.दीपक कोतवाल आणि ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांच्या शुभहस्ते ॲड. कुलकर्णी यांना गौरवले गेले. आयकर कायदा क्षेत्रातील पंचावन्न वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान देण्यात आला. वयाच्या ८९ व्या वर्षीसुद्धा ॲड. कुलकर्णी प्रॅक्टिस करीत आहेत. साहित्य लोभसचे व्यवस्थापक ॲड. वसंत शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. ॲड. कैलास पठारे, ॲड. पांडुरंग ढोरेपाटील, ॲड. योगेश तुपे आणि साहित्य लोभसचे संपादक जयंत शिंदे यावेळी उपस्थित होते. कार्यकारी संपादक ॲड. शिरीष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94125 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..