तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः पुणे स्थानकाच्या न्यू वॉशिंग सायडिंगमध्ये थांबलेल्या लोकलच्या पेंटोग्राफमध्ये झाडाची फांदी अडकल्याने ‘ओएचइ’ चा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्याचा परिणाम पुण्याहून सुटणाऱ्या पाच रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला. डेक्कन, प्रगतीसह अन्य तीन गाड्यांना १ तासांपेक्षा अधिक उशीर झाला. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. पुणे रेल्वे स्थानकांच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्ड जवळच्या ''न्यू वॉशिंग सायडिंग''मध्ये थांबलेल्या लोकलच्या पेंटोग्राफमध्ये झाडाची फांदी अडकली होती. त्यामुळे ''ओएचई जवळ स्पार्किंग होत होते. त्याचवेळी इन्सुलेटरदेखील तुटले. परिणामी शनिवारी सकाळी सातच्या सुमारास स्थानकावरच्या ओएचईचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. हा बिघाड तासाभरानंतर दुरुस्त करण्यात आला. या बिघाडामुळे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ६७ मिनिटे, प्रगती एक्स्प्रेस ४५ मिनिटे, पुणे- लोणावळा लोकल ३७ मिनिटे, सिकंदराबाद - कुर्ला ५३ मिनिटे तर तिरुचिरापल्ली हमसफर एक्स्प्रेस २८ मिनिटे उशीरा धावल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94202 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..