जेईई ॲडव्हान्सची उद्या परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेईई ॲडव्हान्सची उद्या परीक्षा
जेईई ॲडव्हान्सची उद्या परीक्षा

जेईई ॲडव्हान्सची उद्या परीक्षा

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांतील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी जेईई अॅडव्हान्सचे रविवारी (ता. २८) आयोजन करण्यात आले आहे. ही संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) दोन सत्रांत पार पडणार असून, सकाळी नऊ वाजता पहिला तर दुपारी अडीच वाजता दुसरा पेपर घेण्यात येईल.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या वतीने यंदाच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र या आधीच निर्गमित केले असून, रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत परीक्षार्थींना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा केंद्रात जाताना विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र असे आवश्यक असून, प्रत्यक्ष कक्षात मोबाईल, ब्ल्यू-टूथ डिवाईस आदी इलेक्ट्रॉनिक गॅझेट यांस प्रतिबंध केला आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://jeeadv.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

आयआयटी मुंबईच्या वतीने जेईई अॅडव्हान्सचे आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले असून, काही केंद्रांना आम्ही स्वतः भेट देणार आहोत. उद्याच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे.
- प्रा. डॉ. सुभाषिस चौधरी, संचालक, आयआयटी, मुंबई

जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र विद्यार्थी
वर्ष ः संख्या
२०२२ ः १,६०,०००
२०२१ ः १,५१,०००
२०२० ः १,६०,८३८

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94269 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..