वेदनेतून मुक्ती देईल ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेदनेतून मुक्ती देईल ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक’
वेदनेतून मुक्ती देईल ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक’

वेदनेतून मुक्ती देईल ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक’

sakal_logo
By

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये आणि मध्यमवयीन व्यक्तींमध्येही सांधेदुखीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, तासनतास कॉम्प्युटर स्क्रीनसमोर एका विशिष्ट प्रकारे बसून केलेलं काम, व्यायाम आणि संतुलित आहाराचा अभाव यामुळे सांध्यांना आवश्यक ती विश्रांती आणि पोषणमूल्ये मिळत नाहीत. असं असलं तरीही सांधेदुखीचा त्रास होणाऱ्यांनी ‘सांधेदुखी बरीच होत नाही किंवा होणारच नाही’ असे म्हणत पांढरे निशाण फडकवण्याची आवश्यकता नाही. कारण पुणे येथे असलेल्या ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांधेदुखीतून मुक्ती शक्य आहे. हे आपल्या शंभर टक्के आयुर्वेदिक उपचारांतून सिद्ध करून दाखवलं आहे.

डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी १९९१ साली पुणे येथे ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची स्थापना केली. डॉ. जिनवाला हे आयुर्वेदिक डॉक्टर पारशी समाजातील होते. पारशी समाजातील अनेकांना संधिवाताचा त्रास होत असे. तसेच पेनकिलर्सचादेखील त्यांना अधिकच त्रास होत असे. तर आपल्या समाजबांधवांसाठी तसेच इतरांसाठीही या त्रासदायक दुखण्यावर उपाय शोधला पाहिजे, या ध्येयाने आणि हेतूने डॉ. जिनवाला यांनी ही उपचारपद्धती शोधली. त्यांनी १९८७ मध्ये एफडीएकडून परवाना मिळवला. त्यानंतर या उपचाराच्या मानवी चाचण्या पार पडल्या. गेल्या जवळपास ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची प्रशस्त शाखा आहे. गेल्या ३७ वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना संधिवाताच्या दुखण्यातून मुक्त केले असून, वाढती मागणी लक्षात घेता आज पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील नागपूर तसेच गुजरातमधील नवसारी, सुरत येथे ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ अर्थात केंद्रे आहेत. वडोदरा आणि गोवा येथे नजीकच्या काळात क्लिनिक्स सुरू करण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94290 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..