पुण्यातील प्राचीन गणेश मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील प्राचीन गणेश मंदिर
पुण्यातील प्राचीन गणेश मंदिर

पुण्यातील प्राचीन गणेश मंदिर

sakal_logo
By

गणेशोत्सव...भारतीय संस्कृतीतील ऊर्जा वाढविणारा उत्सव. कुणासाठी विघ्नहर्ता, सुखकर्ता, कुणासाठी दुखहर्ता तर लहान मुलांसाठी लाडका बाप्पा. बुधवारपासून या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. त्याची घरोघरी तसेच गणेश मंडळांनीही जय्यत तयारी केली आहे. काही गणेश मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया पुण्यातील दहा प्राचीन गणेश मंदिरांबबत...


१) कसबा गणपती (कसबा) ः
- पुण्याचे ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती ओळखला जातो.
- शहाजीराजे भोसले यांनी १६३६ मध्ये लाल महाल बांधला, तेव्हा जिजाबाईंनी या गणेश मूर्तीची स्थापना केली.
- पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे.
- येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे.
फोटो ः PPRTT22B08469

२) त्रिशुंड्या गणपती (सोमवार पेठ) ः
- त्रिशुंड्या गणपती मंदिर भीमगीरजी गोसावी महंतांनी २६ ऑगस्ट १७५४ रोजी बांधून पूर्ण केले.
- तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे.
- येथील गणपतीच्या मूर्तीची बैठक चौकोनी असून मयूरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे.
- मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम असून मंदिर परिसरातही विविध शिल्पे कोरलेली आहेत.
फोटो ः PPRTT22B08472

३) गुंडांचा गणपती (कसबा) ः
- कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडांचा गणपती नावाचे पेशवेकालीन मंदिर आहे.
- पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता, ‘त्याच्या घराजवळील गणपती’ म्हणून हा ‘गुंडाचा गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे.
- ‘श्रीं’ची उजव्या सोंडेची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
- या मंदिराचा गाभारा दगडी बांधकामातील असून कळसाचे काम २२ फूट उंच आहे.
ःफोटो ः PNE22S87193

४) तळ्यातला गणपती (सारसबाग) ः
- सारसबागेतील गणपती हा तलावाच्या बेटावर असल्याने ‘तळ्यातला गणपती’ म्हणून ओळखला जातो.
- थोरले माधवराव पेशवे यांनी हैदर ‍अलीच्या स्वारीवर जाताना दृष्टान्त झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली, असे म्हणतात.
- येथील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असून सुमारे दोन फूट उंचीची, चतुर्भुज आणि पद्मासनात बसलेली आहे.
- मंदिराचा सभामंडप पूर्वाभिमुख असून सभामंडपाच्या उत्तरेस व दक्षिणेस लहान सभामंडप आहेत.
फोटो ः PPRTT22B08475

५) चिमण्या गणपती (सदाशिव पेठ) ः
- पूर्वीच्या काळी या गणपतीपुढे तांदूळ टिपण्यासाठी खूप चिमण्या येत असतं, त्यामुळे या गणपतीला ‘चिमण्या गणपती’ असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे.
- येथील गणपतीची मूर्ती सुमारे तीन फूट उंचीची, डाव्या सोंडेची व अंगभूत मुकुट असलेली आहे.
- हे मंदिर शास्त्री कुटुंबाच्या मालकीचे आहे. पूर्वी हे मंदिर पटवर्धन व त्याहीपूर्वी काळे यांच्या मालकीचे असल्याचा उल्लेख सापडतो.
फोटो ः PNE22S87229

६) मातीचा गणपती (नारायण पेठ) ः
- कै. शिवरामपंत श्रोत्री यांना मुठा नदीतून वाहत आलेल्या मातीत ही मूर्ती मिळाली, म्हणून यांस मातीचा गणपती म्हणतात.
- येथे शेंदूर लावलेली व सुमारे ४ फूट ६ इंच उंचीची भव्य मूर्ती आहे.
- ही गणेशमूर्ती बैठकीवर बसलेली आहे.
- ही मूर्ती मातीची असल्याने १९६२ च्या पुरामध्ये मंदिरावरून पाणी गेल्यावर मूर्ती विरघळून जाईल, अशी भीती व्यक्त केली गेली होती. मात्र, पूर ओसरल्यावर मूर्तीला कोणताही धक्का लागला नसल्याचे लक्षात आले.
फोटो ः PPRTT22B08482

७) मोदी गणपती (शनिवार पेठ) ः
- या मंदिराचे नाव श्री सिद्धिविनायक मंदिर होते, पण नंतर मोदी बागेत मंदिर असल्याने ‘मोदी गणपती’ असे नाव रूढ झाले.
- मासेमारी करणारी मंडळी या परिसरात बोंबील विकत असतं, त्यामुळे हे मंदिर ‘बोंबल्या गणपती’ या नावानेही ओळखले जाते.
- येथे श्रीगणेशाची शेंदुराची, चतुर्भुज आणि ठेंगणी मूर्ती आहे.
- मंदिराच्या सभामंडपात कोरीव लाकडी खांब आणि एक आयताकृती दालनाचा समावेश आहे. तिथे गणेशाचे वाहन असलेल्या उंदराची मूर्ती आहे.
PNE22S87154

८) दशभुजा गणपती (कोथरूड) ः
- पुण्यात दशभुजा गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत, त्यापैकी कोथरूडची ही मूर्ती सर्वांत मोठी आहे.
- उत्तर पेशवाईत हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधून दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात दिले.
- हा गणपती उजव्या सोंडेचा आणि दहा हात असलेला आहे.
- गणपती बसलेला असून, उजवा पाय दुमडून जवळ घेतलेला व डाव्या पायाची मांडी घातली आहे.
PNE22S87149

९) श्री वरद गुपचूप गणपती (शनिवार पेठ)ः
- चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी १८९२ मध्ये या देवस्थानाची उभारणी केली. म्हणून या गणपतीला ‘गुपचूप गणपती’ म्हणतात.
- मंदिरातील गणेशाची मूर्ती चतुर्भुज व उत्तराभिमुख असून तिची उंची तीन फूट आहे.
- पानशेतच्या पुरात संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले, तरी मंदिरास काही हानी पोचली नाही.
PNE22S87144

१०) फडके गणपती (सिंहगड रस्ता) ः
- सरदार फडके यांनी स्थापन केल्यामुळे हे मंदिर ‘फडके गणपती’ म्हणून ओळखले जाते.
- हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने आहे.
- येथील मूर्ती सुमारे तीन फूट उंच असून थोडीशी सोंड झुकवून विराजमान झालेली दिसते.
- मूर्तीच्या वरच्या दोन हातांत परशू, अंकुश धारण केलेले दिसतात.
PNE22S87155

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94310 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..