आयली घियाची ‘फिट इंडिया चॅम्पियन’ म्हणून निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयली घियाची ‘फिट इंडिया चॅम्पियन’ म्हणून निवड
आयली घियाची ‘फिट इंडिया चॅम्पियन’ म्हणून निवड

आयली घियाची ‘फिट इंडिया चॅम्पियन’ म्हणून निवड

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : नृत्य, क्रीडा आणि अभिनय या क्षेत्रांत तसेच सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत असलेली युवा अभिनेत्री, नृत्यांगना आयली घिया हिची केंद्र सरकारकडून फिट इंडिया चॅम्पियन म्हणून निवड झाली आहे. आयलीज्‌‍ डान्स अँड आर्ट ॲकॅडमीच्या उपाध्यक्षा डॉ. कविता घिया आणि आयली यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली.

आयली हिची केंद्र सरकार स्पोर्टस्‌‍ ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (साई) गेल्यावर्षी ‘फिट इंडिया ॲम्बेसिडर म्हणून निवड केली होती. गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक उपक्रमांची दखल घेऊन या वर्षीही पुन्हा एकदा आयली हिला ‘फिट इंडिया ॲम्बेसिडर बनण्याचा मान मिळाला आहे. आयलीचे आई-वडील डॉ. कविता आणि डॉ. प्रमोद यांच्याकडून तिला आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी घरातूनच बाळकडू मिळाले आहे.

युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या हेतूने ‘फिट इंडिया’ ही संकल्पना केंद्र सरकारमार्फत राबविली जात आहे. दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकाने स्वत:ला आरोग्यसंपन्न ठेवावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयलीने या वेळी सांगितले.

PNE22S87259

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94317 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..