आसाराम बापूंवरील कारवाईविरोधात मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसाराम बापूंवरील कारवाईविरोधात मोर्चा
आसाराम बापूंवरील कारवाईविरोधात मोर्चा

आसाराम बापूंवरील कारवाईविरोधात मोर्चा

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः आसाराम बापू यांना एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राअंतर्गत खोट्या आरोपांच्या आधारे जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या या अटकेस ३० ऑगस्टला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून देशात हा अन्याय दिवस मानला जातो. त्या निमित्ताने मूक मोर्चा काढला जाणार आहे, असे श्री योग वेदांत समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. या मोर्चात युवा सेवा संघ, महिला उत्थान मंडळ, संस्कृती रक्षक संघ, भारत जागृती मोर्चा सहभागी होणार आहेत. हा मोर्चा ३० ऑगस्टला सकाळी ११ वाजता शनिवारवाडा-लाल महल-फडके हौद-दारूवाला पूल-अपोलो चित्रपटगृह -१५ ऑगस्ट चौक- जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94332 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..